शेत बांधाचे अवैध उत्खनाने अर्धा एकर शेतीचे कायमस्वरूपी नुकसान
मानोरा (Kolhapuri dam) : अरुणावती नदी पात्रात मौजे कारखेडा शिवारात शेत सर्व्हे नंबर २५२ ला लागून असलेल्या नदीमध्ये एप्रिल २०२४ मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम मृद व जल संधारण विभाग याजकडून खाजगी कंत्राटदारामार्फत करण्यात आले आहे. या (Kolhapuri dam) कामासाठी मालक कब्जेदार म्हणून माझी व ग्राम पंचायतची बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता नाहरकत व पूर्व परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे.
या बांधण्यात आलेल्या अनधिकृत कोल्हापुरी बंधाऱ्याचे (Kolhapuri dam) सदोष बांधकामामुळे शेत बांधाचे अवैध उत्खनन झाल्यामुळे जवळपास अर्धा एकर शेतीचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. याबाबतची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अश्या मागणीची लेखी तक्रार जिल्हा जलसंधारण अधिकारी याजकडे मौजे कारखेडा येथील शेतकरी चंद्रकांत गजाननराव देशमुख यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कारखेडा शिवारातील अरुणावती नदीपात्रात नदीला लागून असलेल्या शेत सर्व्हे नंबर २५२ च्या हद्दीत आपल्या विभागामार्फत अनधिकृत कोल्हापुरी बंधाऱ्याचे सदोष बांधकामामुळे शेत बांधाचे अवैध उत्खनन झाल्याने अर्धा एकर शेतीचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. याबाबत माहितीनुसार अधिकारात कोल्हापुरी बंधाऱ्याबाबत (Kolhapuri dam) उपविभागीय जल संधारण अधिकारी कारंजा लाड यांच्याकडून माहिती घेतली असता कंत्राटदार मार्फत मोजमाप झाले नसून देयके अदा करणेही अद्याप बाकी आहे. अशी माहिती मिळाली आहे. कोल्हापुरी बंधारा सदोष पध्द्तीने बांधण्यात आल्यामुळे शेतीचे माती वाहून झालेले नुकसान कंत्राटदाराच्या देयकातून वसूल करण्याची मागणी तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्याचे (Kolhapuri dam) बांधकाम करताना कंत्राटदाराने नदी पात्रातील येणारे पाणी थांबविण्याकरीता लागून असलेल्या माझ्या शेतामधील अंदाजे अर्धा एकर शेतातील मातीचे अवैध उत्खनन करून पाणी अडविण्याकरिता बांधण्यात आले आहे. तातडीने शेताच्या बांधाच्या नुकसानीची पाहणी करून शेताची पूर्ववत बांध बंदिस्ती करून देण्याची कार्यवाही कंत्राटदारावर करावी. तसे न केल्यास आपल्या विभागा विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी लागेल, असे तक्रार निवेदन शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी जल संधारण अधिकाऱ्यांना दिले आहे.