गडचिरोली(Gadchiroli):- कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी, लक्ष्मीपुर येथे २१ मे २०२४ रोजी आलेल्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) व चक्रीवादळामुळे चिरचाडी गावातील काही घरांवर झाडे पडून मोठया प्रमाणात घराची हानी झाली. २१ मे च्या रात्रीच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळाने चिरचाडी, लक्ष्मीपुर व लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडित (Power supply interrupted) होण्याबरोबर चक्रीवादळाने घरांची छपरे उडून जात झाडेही मोडून पडली. चीरचाडी व लक्ष्मीपुर येथील लखंदाश श्यामराव करपते, मोरेश्वर श्रीराम उईके, शशिकला सुखदेव कावसे यांच्या घरावरचे छप्पर चक्रीवादळाने उडविलयाने नुकसान(damage) झाले. काही घरांवर झाडे पडून गेल्याने राहत्या घराचे आणि घरगुती सामानाचेही नुकसान झाले. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी(loss of life) झालेली नाही.
नुकसानग्रस्त घराची पाहणी करताना आमदार कृष्णा गजबे
या घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी चिरचाडी व लक्ष्मीपूर यागावी जाऊन नुकसानग्रस्त कुटूंबियाची भेट घेऊन घराची पाहणी केली व संबधित विभागाला पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश दिले. यावेळी भाजपा (BJP) तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, रविंद्रजी गोटेफोडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमनाथ पाटील डोंगरवार ग्रामसेवक गेडाम व गावातील नागरिक उपस्थित होते.