पातूर (Patur) :- गेल्या दोन दिवसापासून सततधार मुसळधार पावसाने (Heavy rain) पातुर तालुक्यासह शहरालगत असलेल्या गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने मोर्णा धरण ची उपनदी मोरणा नदीला पूर आल्यामुळे खामखेड येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून परिसरातील अनेक घरे संततदार पावसामुळे पडले आहेत. परिसरातील छोटे मोठे नदी नाले मोठ्या प्रमाणात ओथंबून वाहू लागले आहे. नदी नाल्यामुळे पुरामुळे नदीलगत असलेले अनेक शेती गेल्या दोन दिवसापासून पाण्याखाली आहे. सदर शेतामध्ये असलेले सोयाबीन कपास (Soybean cotton) अशा अनेक प्रकारचे पिकं पाण्याखाली आल्याने नाशवंत सढणार असल्याच्या अवस्थेत आहे.
पाण्याचा जोर कमी होत नसल्याने नदी लगत शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढत आहे
सविस्तर असे की, गेल्या दोन दिवसापासून सततदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासोबत अनेक शेतकरी (Farmer) पाण्याखाली आहे. गेले दोन दिवस लोटून सुद्धा पाण्याचा जोर कमी होत नसल्याने नदी लगत शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढत आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारी होऊन आपली शेती पिकविण्याच्या मार्गात आहे परंतु आज अतिवृष्टी (heavy rain) चा फटका शेतकऱ्यांना पडत असल्याने शेतपिक धोक्यात असल्याने शासकीय तसेच सावकारी कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ग्रासलेला आहे . यावेळी पातुर पंचायत समितीच्या सभापती व खामखेडचे सरपंच नंदा काळे यांनी शेती पिकाची व पडलेल्या घरांची तलाठी यांच्या समक्ष व गावकरी यांच्या हजेरीत पाहणी केली व तहसीलदार यांना भ्रमणध्वनी द्वारे सूचित केले.
शासनाने तात्काळ रित्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी
अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तसेच पिकाचे प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तात्काळ रित्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत (financial Help) तात्काळ देण्यात यावी. गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने या परिसरामध्ये अतिवृष्टी का घोषित करू नये व झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत का देऊ नये असा सवाल यावेळी येथील सभापती सुनीताताई टप्पे यांनी केला. परिसरातील कोठारी खुर्द गावातील भुजंग टप्पे यांचे राहते घर पडल्याने त्यांचे सुद्धा राहण्याचे हाल झाले आहेत. खामखेडे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले य राम काळे योगेश काळे रंजना काळे मन करना जाधव रुपेश विठ्ठल काळे निलेश श्रीखंडे भिकाजी चव्हाण धनंजय काळे जगदेव काळे गोपाल काळे तसेच गणेश बिलेवार यांचे घराचे नुकसान झाले आहे.