परभणी(Parbhani):- दुचाकीवरुन सोनपेठहून कान्हेगावकडे येत असताना एका ३० वर्षीय तरुणाला आडवून कारमध्ये टाकत त्याचे अपहरण (Abduction)करण्यात आले. यानंतर आरोपींनी पिडितेच्या नातेवाईकांकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितले. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर सोनपेठ पोलीस आणि सायबर सेलच्या (Cyber cell) कर्मचार्यांनी आरोपींचा शोध घेत सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नांदणी गावात असलेल्या घनदाट जंगलातून तरुणाची सुटका केली. आरोपीचा पाठलाग करत तरुणाला सोडविण्यात आले.
आरोपींनी पिडितेच्या नातेवाईकांकडे तीन लाख रुपये खंडणीची मागणी
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, गणपत सखाराम राठोड वय ६५ वर्ष यांनी ६ जुलै रोजी सोनपेठ पोलिसात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा संजय राठोड वय ३० वर्ष हा ५ जुलै रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास दुचाकीने सोनपेठ हून कान्हेगावकडे येत असताना शेळगाव रोडवर लक्ष्मण पवार, मारोती पवार, रामु चव्हाण व अनोळखी तीन ते चार लोकांनी संजयला आडवून मारहाण (beating)करत कारमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेले. आरोपींनी पिडितेच्या नातेवाईकांकडे तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास फोनद्वारे धमकी दिली. फोन अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन पिडित संजय गणपत राठोड यांची सोलापूर जिल्ह्यातील जंगलामधून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोउपनि. राजीव म्हात्रे, पोलीस अंमलदार भगवान मुंडे, गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.