कोरपणा (Chandrapur):- तालुक्यात अल्ट्राटेक अवारपुर, अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट गडचांदूर, तसेच अंबुजा सिमेंट उपरवाही येथे मागील एक दीड महिन्यापासून धाडसी चोऱ्यांचे सत्र सतत सुरू असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाच्या सुरक्षा अधिकारी व पोलीस प्रशासनावर प्रशचिन्ह उपस्थित होत आहेत.
लाखोंचा ऐवज लंपास, व्यवस्थेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रशचिन्ह
कंपनी व्यवस्थापनाच्या देखरेखित एवढी मोठी सुरक्षा गार्ड तैनात असताना मागील दीड महिन्यात या तीनही कंपनीच्या वसाहतीत चोरी करून चोरट्यानी सोने चांदी एवम दाग दागणीन्यावर डल्ला मारल्याने वसाहतीत राहणाऱ्या कामगारामध्ये कमालीची दहशद पाहायला मिळत असून वसाहतीत राहणाऱ्या कामगारांची सुरक्षा दिवसेंदिवस व्यवस्थापनाकडून वाऱ्यावर सोडली जात असल्याचा आरोप होत आहे. कोरपणा तालुक्यातील औद्योगिक परिसर असलेल्या अल्ट्राटेक आवरपुर परिसरात सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या येथील अधिकारी वर्गांच्या वसाहतीमध्ये एकाच रात्री दोन घर फोड्या झाल्यामुळे व्यवस्थापनाची झोप उडाली असून मध्यरात्री तलवार(sword) सदृश्य शस्त्र हातात घेऊन चार चोरटे परिसरात फिरत असल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेरा(CCTV camera) मध्ये कैद झालेले आहे.
४० तोळे सोने (Gold)व ३ किलोच्या जवळपास चांदी चोरीला
चोरांनी दोन घरातून घरमालकांच्या म्हणण्यानुसार ४० तोळे सोने (Gold)व ३ किलोच्या जवळपास चांदी चोरीला गेल्याचे म्हणणे आहे. ज्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि गडचांदूर पोलीस प्रशासनामध्ये खळबळ माजलेली असून आठ ते दहा दिवसांपूर्वी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूर येथे एकाच रात्री पाच वसाहती फोडून चाळीस ते पन्नास लाखाचा ऐवज लंपास केला गेला अगोदर अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथे पाच ते सहा वसाहती फोडून लाखो रुपयाचा ऐवज चोरीला गेला मागील आठ ते दहा महिन्यापूर्वी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर येथे सुद्धा अशाच प्रकारची धाडसी चोरी पाच ते सहा वसाहतीमध्ये झाली. यामध्ये १५ ते २० लाखाचा ऐवज चोरीला गेला मात्र नुकत्याच झालेल्या चोरीमुळे प्रशासनाची झोप उडाली असून प्राप्त माहितीनुसार काही महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या अल्ट्राटेकडील अधिकारी राजेंद्र पारीख यांनी आपल्या पत्नीला वैद्यकीय उपचाराकरिता कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेली वसाहत रिकामी करण्याकरिता अवधी मागितला प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना गुजरात अहमदाबाद येथे अचानक जावे लागले.
दोन ते अडीच किलो चांदीचे शिक्के पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीला
ज्यामुळे घरातील किमती मौल्यवान सोन्या चांदीचे दाग दागिने करून या कुत्र्याची जबाबदारी नौकर गड्यावर सोपवीत उपचारार्थ रवाना झाले. मात्र सकाळी नौकर गळ्याच्या म्हणण्यानुसार अस्ताव्यस्त पडलेले साहित्य व तुटलेला दरवाजा बघता चोरीचा अंदाज लावण्यात आला राजेंद्र पारिख यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरात भविष्यात असणाऱ्या लग्नकार्यासाठी जवळपास ३०ते ३२ तोडे सोन्याचे दागिने याशिवाय दोन ते अडीच किलो चांदीचे शिक्के पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची समजते. याच परिसरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिनस्त असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) आवरपुर शाखेमध्ये नव्यानेच महिन्याभरापूर्वी रुजू झालेले मॅनेजर शाहिद मुबारक हुसेन हे लागून आलेल्या चार दिवसाच्या सुट्ट्यामुळे दिनांक १७ सप्टेंबर रोजी आपल्या परिवारासहित गोवा येथून पर्यटन करून आले असता मुख्य दरवाजावर लावलेली कुंडी तुटलेली त्यांना दिसताच व घरात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य बघता त्यांच्या घरातून दहा तोडे सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे समजते सदरच्या दोन्ही घटना कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उच्चभ्रू वसाहतीत घडल्यामुळे कंपनी प्रशासनाच्या सुरक्षा प्रणालीवर गंबीर प्रश्न उभे झाले आहे.
ठोस पुरावे असल्यामुळे लवकर चोरांना पकडण्याचा विश्वास ठाणेदारांनी व्यक्त करून दाखवला
या परिसरात कायमची सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा अशा धाडसी चोऱ्या होत असल्याकारणाने कंपनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर घटनेची माहिती कडचांदूर पोलिसांना देण्यात आली असून शाहिद हुसेन यांच्या तक्रारीनुसार न्याय दंड संहिता २०२३ कलम ३०५ अ ३३१, ४ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठानेदार शिवाजी कदम हे करीत असून अल्ट्राटेक इथे झालेल्या चोरीच्या परिसरात सुहानपथक फिंगरप्रिंट एक्सपर्ट (Fingerprint Expert) पथक यांना प्रचारण करण्यात आले याशिवाय मिळालेले सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस प्रशासनाकडे असलेले ठोस पुरावे असल्यामुळे लवकर चोरांना पकडण्याचा विश्वास ठाणेदारांनी व्यक्त करून दाखवला. मात्र सदरची घटना ही फार मोठी असल्यामुळे आता जिल्हा पोलीस प्रशासन या घटनेकडे कोणत्या दृष्टीने बघते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.