देशोन्नती इम्पॅक्ट
दारव्हा/यवतमाळ (Darvha Crime) : खरिपाच्या पेरणीला सुरवात होणार असुन तालुक्यात (Bogus seeds) बोगस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता पाहता दैनीक देशोन्नतीने शनिवार दि.८ जुनला ‘बाजारात बोगस बियाण्यांचा शिरकाव’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशीत करुन (Agriculture Department) कृषी विभागाची जागृकता शेतकर्यांसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे प्रकाशीत करण्यात आले होते. दैनीक देशोन्नतीच्या बातमीची दखल घेत कृषी विभागाच्या वतिने दि. ८ जुनला कृषी विभागाच्या भरारी पथकाने (Police Department) पोलीसांच्या मदतीने बोगस बियांण्याची वाहतुक करणारे चारचाकी वाहन दारव्हा शहरात लगत दिग्रस रोडवर सकाळी ९.०० वाजता दरम्यान पकडुन सात जणांवर कारवाई केली आहे.
कृषी विभाग व पोलीस विभागाची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी यवतमाळ जिल्हा (Agriculture Department) कृषी विभागाच्या भरारी पथकास दिलेल्या माहीतीवरुन काही इसम भारत सरकारने प्रतियंवंचीत केलेले कपासी बियाणे हे एका पांढर्या रंगाच्या मारूती सुझुकी इरटीका गाडी क्रमांक एमएच ०३ मीबी ०६८१ ने दारव्हा येथे येत असल्याचे तक्रारदार राजीव शिंदे कृषी अधिकारी पंचायत समिती दारव्हा यांना अवगत केल्याने कृषी विभागाचे भगरी पथक व पोलीस निरीक्षक गजानन गजभारे व टीमने शहरालगत दिग्रस रोडवर सापळा रचुन कारंजाकडुन दिग्रसकडे जाणारे मारोती इरटिका वाहन थांबुन पाहणी केली.
त्यामध्ये विविध कंपनीचे (Bogus seeds) बोगस प्रतिबंधीत कपाशी बियाणे आढळुन आले.यामध्ये चारचाकी वाहनातिल आरोपी शिवाजी सिताराम आडे (३५) रा. वनोली ता. महागाव जि. यवतमाळ, नरेंद्र तुळशिराम राठोड (२८) रा.सुधाकरनगर ता. महागांव जि. यवतमाळ ३) हिरासिंग गणेश राठोड (३२) सुधाकरनगर ता.महागाव जि. यवनमाळ, अवधुत मारोती जाधव (३३),रा.पोखरी ता. महागांव जि. यवतमाळ ,नितीन गोपीचंद पवार (४०) रा.सुधाकनगर ता. महागांव जि.यवतमाळ ,मोहन कनिराम राठोड (५५), रा.सुधाकर नगर पेढी ता. महागांव जि. यवतमाळ असे असल्याने सांगून सदरचे कपासी बियाने कोठून आणले व कोठे घेवून जात होते याबाबत विचारपूस केली असता सदरचे कपासी बियाने गुजरात राज्यातून आरोपी नरेंद्र मफतलाल पटेल उर्फ मंगलभाई पटेल(३५)रा.भाउपुरा ताडी जि. मैसाना येथुन घेवून येत असल्याचे सांगितले. दारव्हा पंचायत समिती (Agriculture Department) कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्या तक्रारीवरून ३६० बोगस बियाणे पॅकीट किंमत ६,३० हजार,चारचाकी वाहन १० लाख,सहा मोबाईल ६० हजार असा एकुण १६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला व सातही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.