दर्यापूर (Daryapur Crime) : पोलीस स्टेशन दर्यापूर येथे दिनांक १८ ऑगस्ट रोजी आरोपी विकी उर्फ किरण होले (वय २८) रा.थीलोरी हे आपली बहीण सौ हर्षा आशिष तायडे यांची पर्स चोरी गेल्याची तक्रार घेऊन आले. (Daryapur Police) पोलीस स्टेशन पोलिसांनी त्या दोघांची तक्रार लिहून घेतली असता.सदर आरोपीने बहिणीला सही न करता घरी पाठवून दिले व आरोपी विकी होले यांनी दारू पिऊन फिर्यादी उमेश उत्तमराव वाकपांजर यांच्या टेबलवर वाजवून म्हंटले की, चोरी करणारा चोर सापडला नाही तर तुम्हाला पाहून घेतो.
यावेळी उपस्थित (Daryapur Police) पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयस्वाल, पोलीस प्रवीण लुंगे व सहकारी यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केले असता आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या अंगावर धावून आला व आई वर अव्वाच भाषेत शिवीगाळ केली यानुसार शासकीय कामात अडथळा आणला याबाबत भारतीय दंड संहिता कलम ४४५/२४,१३२,२२१,२९६,३५१ सी- २ द्वारे आरोपी विकी उर्फ किरण होले यांच्यावर (Daryapur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.