नागपूर (DBT Scholarship) : केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्तीचा केंद्र सरकारचा वाटा हा विद्यार्थ्यांचा थेट खात्यावर येत आहे. एकाच वेळी जास्त पैसा मिळत असल्याने विद्यार्थ्यांही आनंदात असतात. पंरतू विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात (DBT Scholarship) डीबीटीमार्फत आलेली शिष्यृवत्तीमधील काही भाग महाविद्यालयांना द्यावा लागतो. त्यामधील विद्यार्थ्यांना दहा महिन्यांचा मेंटन्स अलाऊस आणि परीक्षा शुल्क आपल्या जवळ ठेवावे लागतो. मात्र काही (Nagpur University) महाविद्यालयांचा डोळाही यावर असल्याने विद्यार्थ्यांनो तुम्हाला मेंटनंस अलाऊंटस (निर्वाह भत्ता) आणि परीक्षा शुल्क परत मिळते काय यविषयी आता चर्चा रंगू लागली आहे.
डीबीटीमार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात
प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रम (examination fee) किंवा परीक्षांचे वेगवेगळे शुल्क आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्वांना शुल्क भरण्याची वेळ येऊ नये आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम रितसर व्हावा याकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती देत असते. एकून अभ्यासक्रमाचे शुल्क आणि विद्यार्थ्यांना भेटणारे फायदे म्हणजे मेंटेनंस अलाऊंस (निर्वाह भत्ता) आणि परीक्षा शुल्क होय. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनो डीबीटीवर शिष्यवृत्तीचा अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना बर्याच गोष्टी समजतात. स्वत: अर्ज केले तर शुल्क द्यावे लागत नाही. यूजर आयडी आणि पासवर्ड सुद्धा माहित असतो. परंतु राज्यातील सर्वच महाविद्यालयातील (DBT Scholarship) शिष्यवृत्ती विभाग असलेल्या बाबूकडून विद्यार्थी अर्ज भरून घेतो. त्यामुळे मुळ शैक्षणिक कागदपत्र सुद्धा जमा द्यावे लागते. ऑनलाईन अर्ज असल्याने बाबूकडून एका अर्जाचे २०० रुपये शुल्क आकारले जाते. विशेष असेकी, पुढे विद्यार्थ्यांना यूजर आयडी आणि पासवर्ड सुद्धा मिळत नाही.
शासन संस्थांना किती पैसे देणार?
तरी शिष्यवृत्तीचा अर्ज केल्यानंतर सरकारतर्फे (DBT Scholarship) डीबीटीमार्फत संस्थांना देय असलेली रक्कम सुद्धा दिली जाते. केंद्र (६०टक्के) आणि राज्य सरकार (४०टक्के) चा वाटा हा वेगवेगळा असतो. शासन संस्थांना किती पैसे देणार आणि विद्यार्थ्यांना किती देणार याचा लेखा जोखा हा डिबीटीच्या वॉवूचर कॅल्क्युलेशनमध्ये स्पष्ट दिलेला असतो. सरकारनेही विद्यार्थ्यांना समजेल अशी सुविधा स्पष्ट उपलब्ध करून दिली आहे. तरीही अनेक विद्यार्थ्यांना ते समजण्यात जड जाते.
विद्यार्थ्यांना नेमकी किती शिष्यवृत्ती मिळते?
शासनातर्फे संस्थाना देत असलेली रक्कममध्ये ट्युशन फि, इतर फि, अॅडमिशन फि, लॅबोरेटरी फि, लायब्ररी फि, जिमखाना फि, सह इतर शुल्काचा यात समावेश असतो. हे रक्कम संस्थेकडे जमा केले जाते. तर विद्यार्थ्यांना दहा मेहिन्यांचा मेंटनंस अलाऊस मिळतो. अभ्यासक्रमानुसारही त्यात बदल असते. शिवाय परीक्षा शुल्क विद्यार्थी संस्थेत जमा करते, ते शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परत मिळत असते. तरी आपल्याला नेमकी किती (DBT Scholarship) शिष्यवृत्ती मिळते याविषयी विद्यार्थी नेहमी संभ्रमात राहत असतात.