वसमतच्या कार्यकर्ता मेळाव्यात “दादांचा वादा”
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत वसमत येथे कार्यकर्ते मेळावा
वसमत (Ajit pawar) : “तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत राजू नवघरे यांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. त्यावेळी राजू नवघरे (Raju Navghare) यांना संधी देण्यात येईल, माझा शब्द मी विसरलेलो नाही” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले दादांचा हा वादा ऐकून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला वसमत येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी शनिवारी मार्गदर्शन केले.
वसमत येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला प्रचंड संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit pawar) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, आ. राजू पाटील नवघरे, आ. विक्रम काळे, लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर,मीनल खतगावकर, राजूभैया नवघरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमामा ढोरे माजीआमदार ओमप्रकाश पोकर्णा, नजीबमुल्ला , सभापती सभापती तानाजी पाटील बेंडे, सभापती त्रंबक कदम ,जिजा हरणे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन शिंदे, शहराध्यक्ष मुजीब पठाण, अमजदखान नम्मू , शेख मिठू मिस्त्री, अब्दुल सत्तार,अमजद सिद्दिकी, गजानन नवघरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अजित दादा पवार (Ajit pawar) यांच्या हस्ते वसमत शहरासाठी 156 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले कुरुंदा पूरनियंत्रण उपायोजना कामाचे भूमिपूजन झाले तर बाभुळगाव येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी आमदार राजू पाटील नवघरे (Raju Navghare) यांना अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल असा वादा केला महायुतीच्या सरकारमध्ये सर्वांना सोबत घेत कामे होत असून पाच आमदार मागे एक मंत्री असे सूत्र ठरलेले आहे त्यामुळे सर्वांना संधी मिळावी यासाठी अडीच वर्षानंतर नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे.
माझा तुम्हाला दिलेला शब्द मी विसरलेलो नाही मी शब्द पाळणार आहे. त्यामुळे अडीच वर्षांनंतर राजू नवघरे यांना संधी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले दादांचा हा वादा ऐकून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करून राष्ट्रवादी काँग्रेस व अजितदादा पवार (Ajit pawar) यांच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. लाडक्या बहिणीकरिता 45 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून लाडक्या बहिणींना अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही,शेतकऱ्यांसाठी विविध योजना,बंधारे, केळी संशोधन ,हळद उत्पादक संशोधन कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
वसमत साठी सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना व इतर सिंचन योजना यासह वसमतच्या विकासासाठी आमदार राजू नवघरे यांचा सतत पाठपुरावा असतो त्यामुळे त्यांनी आणलेल्या विकास कामासाठी मी कधीही निधी कमी पडू देत नाही. वसमत विधानसभा मतदारसंघाचे विकास कामासाठी सरकारची तिजोरी खुली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामे केली पाहिजे आम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. खासदार आमदारकीच्या निवडणुकी संपल्या आता कार्यकर्त्याच्या निवडणुका होणार आहेत, त्यांनाही योग्य संधी मिळायला पाहिजे असे सांगत गावपातळीवर कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य करावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार राजू पाटील नवघरे (Raju Navghare) यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा मतदारसंघावर अजितदादा पवार (Ajit pawar) यांचे विशेष लक्ष आहे. विकासासाठी त्यांनी सढळ हाताने निधी दिला त्यामुळेच वसमत मतदार संघात विकास होऊ शकला पूर्णा नदीवरील बॅरिचेस, सिंचनासाठीच्या विविध योजनांना निधी, एमआयडीसी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा यासहमतदारसंघातील प्रत्येक विकास कामासाठी दादांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
वसमत मतदारसंघ सिंचनासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात कार्यरत करायची आहे महत्त्वाकांक्षी योजनेसाठी दादांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे ही योजना पूर्ण झाली तर वसमत मतदार संघातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल पाणी कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी आमदार राजू पाटील नवघरे यांनी व्यक्त केला.
वादळी वारे व पावसातही कार्यकर्ते ठाम
कार्यक्रम प्रारंभ होण्यापूर्वी जोरदार वारे व जोरदार पावसाने हजेरी डावी त्यामुळे कार्यक्रम स्थळावरील शामियाने पडदे व आसान व्यवस्था विस्कळीत झाली विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे गोंधळ उडाला ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते जोरदार पावसामुळे मैदानावरील कार्यक्रम मंगल कार्यालयात घ्यावा लागला. भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता कार्यक्रमाची जय्यत तयारी व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून अजित दादा पवार (Ajit pawar) यांनी कार्यकर्त्यांचे व कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या राजू पाटील नवघरे (Raju Navghare) यांचे कौतुक केले.