हिंगोली (Hingoli Dead Body) : कयाधू नदीच्या पात्रामध्ये पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) मंगळवारी आढळला. सायंकाळी ५ वाजल्या पासून पुलावर पाहणार्यांची गर्दी असताना हिंगोली ग्रामीण की हिंगोली शहर हद्दीतील घटना यावर तर्कवितर्क लावून नेहमी प्रमाणे पोलिस उशिराने आल्याने काही नागरिकांनी संताप व्यक्त केला.
हिंगोली शहर हे जिल्हास्तरीय असून कोणतीही घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी धावून जात असते. १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कयाधू नदीच्या पुलाखाली नदी पात्रात (Dead Body) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पाहता पाहता ही वार्ता शहरभर पसरल्याने बघ्यांची गर्दी पुलावर व नदीकाठी मोठी झाली होती. या गर्दीमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
परंतु ही घटना नेमकी हिंगोली शहर की हिंगोली ग्रामीण हद्दीत घडली, याबाबत पोलिसांमध्येच तर्कवितर्क लावले जात होते. अखेर ही (Dead Body) घटना हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुठे या ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी सायंकाळी ६ वाजता आल्याने घटनास्थळी आले. उपस्थित नागरीक व पोलिस कर्मचारी जाधव यांनी पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला. ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.