दुचाकीस्वार टेलर व्यवसायिकाचा मृत्यू
सालई/खुर्द (Bike road Accident) : रामटेक-तुमसर मार्गावरील सालई (खुर्द) गावाजवळ दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान रस्त्यावर मृतावस्थेत असलेल्या रानडुकराला मोटारसायकल आदळल्याने झालेल्या अपघातात सालई (खुर्द) येथील जयस्वाल संभा मांढरे (३८) या टेलर व्यवसायिकाचा मृत्यू झाला. (Bike road Accident) सालई (खुर्द) येथील जयस्वाल मांढरे हा टेलर व्यवसायिक असून त्याचे आंधळगाव येथे टेलरिंगचे दुकान आहे. दि.२८ एप्रिल रोजी तो आपल्या दुचाकीने दुकानात गेला होता. सायंकाळी ७ वाजता दरम्यान दुकान बंद करून गावाकडे परत जात असताना गावाजवळ रस्त्यावर मृत डुक्कर पडून होता.
अंधारात रस्त्यावरील डुक्कर त्याला दिसून न आल्याने दुचाकीची रानडुकराला धडक बसली. त्यात (Bike road Accident) दुचाकीस्वार टेलर रस्त्यावर पडून जखमी झाला. त्यावेळी शेतातून घरी जाणार्या ग्रामस्थांना जयस्वाल मांढरे हा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे दिसून येताच याची माहिती गावात पसरली. गावकर्यांसह कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमीचा रात्री ९.३० वाजता दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे मृत्यूपश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून त्याच्या (Bike road Accident) अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.