अन्यथा कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागणार: जिल्हाधिकारी राजेश गुंजाळ
हिंगोली (Ration card) : जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांनी ई-केवायसी (e-KYC) अपडेट करणे गरजेचे असल्यामुळे ३० जूनपर्यंत त्याकरीता मुदत दिली होती. आता ही मुदत वाढविली असून ३० जुलै पर्यंत ई-केवायसी करणे आवश्यक आहे अन्यथा लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. हिंगोलीतील अनेक नागरिकांकडे राशन कार्ड उपलब्ध आहेत. त्यामुळे (Ration card) राशन कार्ड धारकांनी आपल्या कार्डवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन त्याचे सत्यापन करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.
अन्यथा त्यांचे शिधापत्रिकेतून नाव वगळले जाणार आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा विभागातर्फे प्रत्येक (Ration card) राशन दुकानासमोर या संदर्भातचा फलक लावण्यात आला आहे. शिधापत्रिका धारकांनी आपला मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक करून घेणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तीचे (e-KYC) ई-केवायसी अपडेट केलेल्या आधार कार्ड आणि शिधापत्रिकांची छायांकित प्रत दुकानात जमा करावी लागणार आहे. अन्यथा १ ऑगस्ट पासून लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
सत्यापन करून घेणे सक्तीचे
जिल्ह्यात अनेक राशन कार्ड (Ration card) धारक असून कार्डमधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्याचे सत्यापन करून घेणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक राशन कार्ड धारकांनी कुटुंबातील सर्व व्यक्तींचे (e-KYC) ई-केवायसी अपडेट केलेले आधार कार्ड व शिधापत्रिकेची छायांकित प्रत राशन दुकानात जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांनी केले आहे.