मानोरा (Death Anniversary) : मानोरा येथील शासकीय विश्रामगृहात दि. ११ फेब्रुवारी रोजी त्याग, तपस्येचे मूर्तिमंत, एकात्म मानववाद आणि अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानोरा भाजपा मंडळाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक प्रख्यात भारतीय राजकारणी, तत्वज्ञानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत होते, ज्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.त्यांनी एकात्मिक मानवतावाद आणि अंत्योदयाचे तत्वज्ञान मांडले. मथुरा येथे जन्मलेल्या आणि कठीण परिस्थितीत वाढलेल्या उपाध्याय यांनी आपले जीवन राष्ट्रीय सेवेसाठी आणि स्वदेशी विचारसरणीसाठी समर्पित केले आहे. पंडित दिनदयाळजी उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी मानोरा मंडळ च्या वतीने त्यांच्या प्रतीमेचे शासकीय विश्रामगृहात बुधवारी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद इंगोले, भाजपा पदाधिकारी राजू देशमुख, प्रविण धोटे, संजय गावंडे, मनोज खडसे, श्याम डोळस, गौरव पुसदकर, डॉ सुहास देशमुख, निलेश चौधरी, नागोराव घोरसडे, जयस्वाल, अमोल राऊत, डॉ हरीश नवहाल, भैया देशमुख, सौरव राठोड प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




