राजुरा (Death Body) : बल्लारपूर वेकोली अंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या (Coal mine) कोळसा खदानीतून वेकोलीचे सुरक्षा रक्षक सोहेल खान लापता असल्याचे वेकोलीच्या लक्षात येताच वेकोली प्रशासनाने आपल्या अंतर्गत यंत्रणांना सुचना देऊन युध्द पातळीवर शोध कार्य सुरू केले. मात्र सोहेल सापडेना 27 ला सकाळीच सोहेलचे कुटूंब येऊन कोळसा खाणीच्या गेटवर धरणा देऊन 3 तास खणीचे काम बंद पडले. त्यानंतर वेकोली व (Police Administration) पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले. त्याचा कसून शोध घेण्यात आला. अखेर चवथ्या दिवशी सोहेलचा मृतदेह (Death Body) खाणीतच माती डम्पिंगमध्ये दबलेल्या स्थितीत सापडला.
वेकोलीच्या सास्ती कोळसा खाणीतून बेपत्ता असलेला सोहेल खान
चार दिवसांपूर्वी दुपारच्या पाळीत कामाला असलेला सोहेल चारदिवस होऊनही सापडत नसल्याने वेकोली सह (Police Administration) पोलीस प्रशासनही टेन्शनमध्ये आले होते. चार दिवस उलटत आल्याने घरच्यांनी आपत्ती दर्शवली सोहेल ची गाडी तिथेच असून ड्युटी होऊनही घरी न आल्याने घरच्या सोबत आता वेकोली प्रबंधन सोबत पोलिसही शोध कार्यात गुंतले होते. खान यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने. खान सास्ती (Coal mine) कोळसा खाणीतील माती डंपिंगमध्ये ते मातीत दबले असावे. यादिशेने तपस सुरू झाला अन त्यातच आज 28 ला मृतदेह (Death Body) दुपारच्या सुमारास खणीतच मिळाला.
आपल्या ड्युटीवर तैनात असलेला सुरक्षा रक्षक सोहेल खान त्यांची ड्युटी डम्पिंगच्या ठिकाणी होती ड्युटी संपल्यानंतरही घरी न पोहोचल्याने त्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सोहेलची मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ बीजे ८२५ पार्किंगमध्ये उभी असल्याचे समजले. पण त्याचा कुठेही थांगपत्ता नाही. तीन दिवस होऊनही भेटत नसल्याने सोहेल चे कुटुंब त्याची पत्नी आई सह अन्य नातेवाईक (Coal mine) खाणीत येऊन माझ्या सोहेलचा तात्काळ शोध घ्या. असा एकच टाहो फोडल्याने वेकोली व पोलीस प्रशासन जागे झाले. या खुल्या खदानतील जमीन खोदून सोहेलचे शोध घेतला जात होता.
पण वेकोलिचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत होते. मुख्य महाप्रबंधक यांनी घटनास्थळी यावे अशी मागणी करीत होते. या परिसरात (Coal mine) कोळसा तस्कर, डिझेल, भंगार चोर सक्रिय असल्याने सोहेल तोल जाऊन पडला की कोणी ढकलला. याबत शंका कुशंका व्यक्त होत आहे. (Death Body) सोहेल कुटुंबातील व्यक्तीला नोकरी व उचित नुकसानभरपाई दिल्या जाईल, असे कम्पनिकडून सांगण्यात येत असले. तरी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी कामगारवर्गातून व सोहेल च्या कुटुंबातील व्यक्तीकडून केली जात आहे