परभणी(Parbhani):- शहरातील प्रभावती नगरामध्ये एका सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह (dead body)राहत्या घरात मंगळवार २१ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास आढळून आला. नानलपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. सहाय्यक अभियंत्याच्या मृत्युचे नेमके कारण समजु शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी (postmortem)जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पंचनामा करुन मृतदेह ताब्यात
या घटनेविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, संजय राजाभाऊ मंठेकर वय ५६ वर्ष रा. प्रभावती नगर परभणी, असे मृतकाचे नाव आहे. संजय मंठेकर हे जालना जिल्ह्यातील अंबड पंचायत समितीत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. ते आपल्या पत्नीसह मुलांकडे पुणे येथे गेले होते. सोमवारी संजय मंठेकर परभणीला घरी परत आले. मंगळवारी सकाळी त्यांनी फोन करुन एका ऑटो चालकाला घरी बोलावले. ऑटो चालक येई पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यातील अंमलदार बाबासाहेब बिक्कड, दिनेश जाधव, यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास बीट जमादार बाबासाहेब बिक्कड करत आहेत.