पुसद (Death fast Andolan) : पुसद तालुक्यातील जांबबाजार सर्कल मधील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जमशेटपूर येथील चंदन रामजी चव्हाण यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत सह वरिष्ठ स्तरावर शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण ग्रामपंचायत ने काढावे याकरिता निवेदने व तक्रारी दिल्या होत्या. या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी शासकीय कार्यालयांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे आवश्यक असणारे कागदपत्र मोजणी याची मागणी केली आहे.
असे पत्र उपोषणकर्ता चंदन चव्हाण यांना ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले होते. शासकीय रस्त्यांची अचूक मोजणी करण्याकरिता व (Remove encroachment) अतिक्रमण निश्चित ओळखण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीची मागणी ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली आहे. जेव्हा सदरील मोजणी होऊन शासकीय जागेवरील अतिक्रमणाची निश्चिती सिद्ध झाल्यास ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमण काढण्यात येईल असे पत्र ग्रामपंचायत च्या सचिव शितल राठोड यांच्यामार्फत संबंधितांना देण्यात आले होते.
तरीही मात्र त्यांनी दि. 27 जुलैपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वेळोवेळी प्रभारी गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व सहाय्यक गट विकास अधिकारी संजय राठोड यांनी उपोषणकर्त्यांना भेटी देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र उपोषण करता आपल्या मागणीवर ठाम आहे. 12 व्या दिवशी ही (Death fast Andolan) अमरण उपोषण सुरूच आहे.
सदरील उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या मागणी संदर्भात भूमि अभिलेख कार्यालयाकडून मोजणी निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल असं सांगितलं, तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सदरील अतिक्रमण काढण्यात येईल असं सांगूनही उपोषण करता ऐकायला तयार नाही.
– ज्ञानेश्वर टाकरस, प्रभारी गटविकास अधिकारी.