बोरी(Parbhani):- सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ७० वर्षीय वृध्दाला दुचाकीने धडक दिल्याची घटना सोमवार २७ मे रोजी कौसडी – बोरी रस्त्यावर घडली. या अपघातात सदर इसमाचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील अन्य ३ जण जखमी झाले आहेत.
क्रमांकाच्या दुचाकीने शेख महेबुब यांना जोराची धडक दिली
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेख मेहबूब शेख रहीम (७० वर्ष) हे नेहमीप्रमाणे सोमवार २७ मे रोजी कौसडी – बोरी रस्त्यावर मॉर्निंंग वॉकला (Morning walk)गेले होते. घराच्या काही अंतरावरच बोरीवरून मारवाडीकडे जाणारी दुचाकी एमएच ३८ एम – ५२ ३८ या क्रमांकाच्या दुचाकीने शेख महेबुब यांना जोराची धडक (strike)दिली.
शवविच्छद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
या अपघातात ते गंभीर जखमी (seriously injured) झाले. त्यांचे घर काही अंतरावरच असल्याने अपघाताची माहिती त्यांची मुले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकावरील तिघे जण जखमी झाल्याने त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये(Rural hospitals) दाखल करण्यात आले आहे. डॉ.बी के पवार, सिस्टर आसरा गाढवे, सय्यद इसाक यांनी प्रथम उपचार केले. शेख महेबुब शेख रहीम यांचे शवविच्छद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया बोरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. शेख महेबुब शेख रहीम यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.