देऊळगाव राजा(Buldhana):- श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक तथा काँग्रेस (Congress)नेते देवानंद खंडूजी कायंदे यांचे गुरुवार २ ऑक्टोबर रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्व तथा काँग्रेसनेते..
आज शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे पार्थिव देऊळगाव राजा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळी परिसरातील कायंदे परिवाराच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. दुपारनंतर समर्थ कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार विधी पार पडला. त्यावेळी जिल्हाभरातून प्रचंड जनसागर लोटला होता. याप्रसंगी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. सत्यजित तांबे, अर्जुन खोतकर, श्याम उमाळकर, नरेंद्र खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, तोताराम कायंदे, विजयराज शिंदे, डॉ गणेश मांन्टे, विजय अंभोरे, विनोद वाघ, शर्वरी तुपकर, पत्रकार राजेंद्र काळे, अजीम नवाज राही आदींनी याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे९ वाजता देऊळगाव राजा येथे समर्थ कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.