चंद्रपूर(Chandrapur):- पवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या बल्लारपूर कोळसा खाणीमुळे निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे साखरी गाव तलावातील हजारो मासोळ्या(Fish) मृत्यू पावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे साखरी गावातील मानवी जीवनावरही धोका निर्माण झाला आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई (action)करण्याची मागणी केली आहे.
पवनी राजेश बेले यांनी केली कडक कारवाईची मागणी
दिनांक २० मे २०२४ रोजी, WCL च्या बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य साखरी गाव तलावात मिसळले. यामुळे तलावातील हजारो मच्छी मृत्यू पावल्या. दूषित पाण्यामुळे हवेमध्ये घातक गॅस पसरल्याने साखरी गावातील लोकांना आरोग्य धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, WCL मुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषण(Air pollution) , ध्वनी प्रदूषण (noise pollution)आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील लोकांमध्ये त्रास होत आहे.
WCL विरोधात अनेक आरोप
राजेश बेले यांनी WCL विरोधात अनेक आरोप केले आहेत. कोळसा हाताळणी करताना WCL द्वारे घातक वायू प्रदूषण केले जात आहे. घातक रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडून WCL पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत आहे. कोळसा खाणीतील धुळीमुळे वायू प्रदूषण होत आहे. जडवाहतुकीमुळेही वायू प्रदूषण होत आहे. WCL च्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण (Environment) परवानगी रद्द करून, WCL च्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकांवर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. WCL मुळे झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावांना योग्य नुकसान भरपाई देणे, आदी मागण्या राजेश बेले यांनी केल्या आहेत.