पुसद(Pusad) :- मागील 9 दिवसांपासुन पुसद कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीच्या 16 कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन आता गंभीर वळणावर आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 5 ऑगस्ट पासुन आमरण उपोषणाचा ईशारा त्यांनी दिला आहे.
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण
पुसद बाजार समितीच्या लेखापाल ते चपरासी अश्या 16 कर्मचाऱ्यांनी पगार नियमित करणे, भविष्य निर्वाह निधी, ग्रेच्युटी, जिवन विमा हप्ते, सातव्या वेतन मधील फरकाची कटोती केलेली रक्कम जमा करणे, मृत झालेल्या लेखापाल हमद यांच्या पत्नीला आर्थिक मदत (financial aid)मिळवून देणे व कर्मचाऱ्यांशी निगडित न्याय प्रविष्ठ प्रकरणासंदर्भात अनेक पत्र व्यवहार करुनही न्याय न मिळाल्याने 22 जुलै पासुन बाजार समितीच्या आवारात आंदोलन सुरू केले.