विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू
मानोरा/वाशिम (Electric shock Death) : तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाईगौळ येथील प्रल्हाद लालासिंग चव्हाण ( वय ६० ) यांचा २१ जुलै रोजी सकाळी घरात (Electric shock) विजेचा धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू (Youth death) झाला. प्रल्हाद चव्हाण हे सकाळी उठल्यानंतर घरातील विजेचा बल्ब बंद करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चव्हाण यांच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांकडून विज वितरण कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली. प्रशासनाकडून चव्हाण यांच्या मृत्यूची दखल घेण्यात आली असून, प्रशासनाकडून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली, असल्याची माहिती मिळाली आहे.
विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू
कारंजा: विजेचा धक्का (Electric shock) लागल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. ही घटना २० जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील तुळजापूर येथे घडली. माहितीनुसार, शेतातील काम पूर्ण करून एक बैलगाडी गावात येत असताना विजेच्या खांबाजवळ खड्ड्यात साचलेल्या पाण्यात दोनपैकी एका बैलाचा पाय गेला. या पाण्यात विज प्रवाह सुरू असल्याने विजेचा धक्का लागून संदीप ज्ञानेश्वर इंगळे यांच्या बैलाचा मृत्यू (Bull death) झाला. या घटनेत इंगळे यांचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वीज कंपनी अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व इतर सोपस्कार पार पाडले.