कारंजा(Washim):- एक 45 वर्षीय व्यक्ती टिनपत्रे सावरत असताना पाय घसरून पडून जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात(Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत(Dead) घोषित केले. राजेश रमेशलाल जयस्वाल वय 45 वर्ष असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मानोरा तालुक्यातील कुपटा येथील रहिवासी होता.
टिनपत्रे सावरत असताना घडली घटना
प्राप्त माहितीनुसार 26 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या कुपटा बसस्थानक परिसरातील दुकानावरील टिन पत्रे सावरत असताना अचानकपणे पाय घसरून खाली पडला आणि जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला कुटुंबीयांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospitals) दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, 27 जून रोजी शवविच्छेदन(Autopsy) करून मृतदेह(dead body) कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कारंजा शहर पोलिसांनी या संदर्भात आकस्मित मृत्यूची(Sudden death) नोंद घेतली असून, पुढील तपासासाठी प्रकरण मानोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल.