परभणी(Parbhani) :- कर्ज (loan)फेडण्यासाठी माहेरहून पन्नाास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत २५ वर्षीय विवाहितेला जबर मारहाण करण्यात आली. जखमी विवाहितेला सासरच्या मंडळींनी परभणी येथे माहेरी आणून सोडले. विवाहितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास विवाहितेचा मृत्यू (Death)झाला.
सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर कोतवाली पोलीस (Police)ठाण्यात रविवार २३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सना बेगम शेख शाकेर वय २५ वर्ष, असे मृत विवाहितेचे नाव आहे. या बाबत शेख रईस यांनी तक्रार दिली आहे. सना बेगमचे लग्न बीड जिल्ह्यातील वडगाव येथील युवकासोबत झाले होते. सासरच्या मंडळींनी लोकांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करत विवाहितेला जबर मारहाण (severe beating) करण्यात आली. विवाहिता पोलीस स्टेशनला तक्रार देईल या भितीने तिला सासरच्या मंडळींनी परभणी येथील माहेरी आणून सोडले. जखमी विवाहितेला १७ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान २२ जुला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख शाकेर, शेख युनूस, सुगराबी शेख, फरजाना यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.