गंगाखेड(Gangakhed):- शहरातील महात्मा फुले नगरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक २७ एप्रिल शनिवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यात गळफास घेतल्याच्या खुणा न आढळल्याने विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात राहत असलेल्या प्रतिक्षा विशाल हनवते वय २२ वर्ष हिने गळफास (hanging) घेतला म्हणून दिनांक २७ एप्रिल शनिवार रोजी सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास पती विशाल हनवते याने गंगाखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात (Government Upazila Hospitals) उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य मुळे, परिचारिका वैशाली केंद्रे, उषा इधाटे, संगीता केंद्रे यांनी तिला तपासून मृत (dead) घोषित करत पोलीस ठाण्यात एमएलसी पाठविली तेंव्हा पोलीसांनी विवाहितेचा पती विशाल हनवते यास पोलीस ठाण्यात बसवून ठेवत दुपारी १२ वाजता सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड, बिट जमादार मारोती माहुरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वार्डात असलेला विवाहितेचा मृतदेह शवागृहात (Mortuary body) नेऊन पंचनामा केला.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील घटना
शवविच्छेदन(Autopsy) केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस डायरीत अकस्मात मृत्यूची (sudden death) नोंद घेण्याची भूमिका पोलीसांनी घेतल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या मांडून खुनाचा गुन्हा दाखल करा नाहीतर दोषींना आमच्या ताब्यात द्या असे बोलल्याने पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी संतप्त झालेले नातेवाईक काही एक एकत नसल्याचे पाहून सायंकाळी ७:३० वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी नातेवाईकांची समजूत काढल्याने तणाव निवढला. ८:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात जमलेले नातेवाईक अंत्यविधीसाठी निघून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गंगाखेड पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने परभणी येथून तसेच पालम, पिंपळदरी, सोनपेठ पोलीस ठाण्यातील कुमक पोलीस ठाण्यात मागविण्यात आली होती.