कारंजा(Washim) :- ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना १ ऑगस्ट रोजी नागपूर- संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील अनई फाट्याजवळ घडली होती. या अपघातातील जखमी २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. संतोष नथुजी घुगे ( रा. दोनद ) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ०८ व्ही १४८० क्रमांकाच्या प्रवासी ऑटोला (Auto)ट्रकने (Truck)जोरदार धडक देवून तेथून पळ काढला होता. या घटनेत ऑटो पलटी झाल्याने त्याखाली दबून संतोष नथुजी घुगे याच्यासह अन्य तिघे जखमी झाले होते. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती (Amravati) रेफर करण्यात आले होते. मात्र, मार्गातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.