परभणी/जिंतूर(Parbhani):- जबर मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death)झाल्याची घटना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथे घडली होती. सदर घटनेत एक वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने आरोपींवर २९ नोव्हेंबर २०२४ ला बोरी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
परभणीतील बोरी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल
विलास गणेशराव देशमुख यांनी तक्रार दिली आहे. कल्याण गणेशराव देशमुख (वय ३० वर्ष, रा. मारवाडी ता. जिंतूर) असे मयताचे नाव आहे. या घ्ज्ञटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी संगणमत करत फिर्यादीच्या भावाला ग्रामपंचायतीच्या पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरुन मारहाण करत खून (Murder)केला होता. याबाबत न्यायालयामध्ये दाद मागिण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन आनंता देशमुख, पवन देशमुख, मदन देशमुख यांच्यावर बोरी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. गोपीनवार करत आहेत.