लातूर (Latur) :- महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मुदतवाढीकरिता लोकनेते बालाजी पाटील चाकूरकरांचे आझाद मैदान येथे सोमवार, दि. 3 मार्चपासून आमरण उपोषण होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी लाडक्या बहीण योजनेसह लाडका भाऊ योजना सुरू केली व लाखो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला; परंतु त्यांचे ६ महिन्याचे प्रशिक्षण फेब्रुवारी व मार्चमध्ये पूर्ण होत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा सुशिक्षित बेरोजगार होतील. यासाठी या सर्व प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर न सोडता यांच्या हाताला काम मिळावे व कालावधी वाढवून देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषण होणार आहे.
चाकूरकरांच्या नेतृत्वात बेरोजगारांचा लढा…
शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महाराष्ट्रात १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थी जे बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेले प्रशिक्षणार्थी ६ हजार, ८ हजार व १० हजार मानधनावर काम करीत आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींची मुदत फेब्रुवारी व मार्च महिन्यात संपत असून या मुख्यमंत्री (Chief Minister)युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची मुदत वाढ मिळावी याकरिता महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलने व उपोषण करण्यात येत आहेत. परंतु अद्याप राज्य सरकारने (State Govt) मुदत वाढीचा जीआर काढलेला नाही. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर हे दिनांक ३ मार्च २०२५ रोज सोमवार सकाळी ११ वाजता आझाद मैदान मुंबई येथे १०१ प्रशिक्षणार्थींसह आमरण उपोषणास बसणार आहेत.
या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लातूर जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे, शुभम पांचाळ, गोविंद टोम्पे, सुजितकुमार शिंदे, विष्णू क्षीरसागर, अभिनय सूर्यवंशी, रवी भोसले, शेळके वैष्णवी, प्राजक्ता मांदळे, पूजा इंगळे ,ज्वालामुखी सरवदे, तानाजी कांबळे ,प्रथमेश लंगडे , हजारे खंडू, सुशांत भंडारकोटे, आकाश सावंत, कविता बडोरे आदींनी केले आहे.