मंगरूळपीर (Death threats) : विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली असून, दोन गटाकडून मंगरूळपीर पोलिसात (Mangrulpir police) परस्पर तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्हीही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली की, फिर्यादी तिच्या जाऊसोबत बाजारात जात असताना आरोपी देविदास जाधव यांनी लग्नाचा डीजे माझ्या घरासमोरून लवकर का नेला नाही, असे म्हणत शिवीगाळ करून विनयभंग केला. तर मधुकर जाधव, पंडित जाधव ,सोहम जाधव यांनी हातात दगड घेऊन जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. तर दुसर्या गटातील एका ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली की ,फिर्यादीच्या मुलीचा विषय काढून आरोपी दीपक राठोड यांनी विनयभंग केला. तर उमेश राठोड यांनी हातात दगड घेऊन जीवाने मारण्याची धमकी दिली, अशा परस्पर विरोधी तक्रारीवरून (Mangrulpir police) मंगरूळपीर पोलिसांनी दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.