लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचे अंदोलन!
लातूर (Santosh Deshmukh murder case) : लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाज बांधवांनी, व तरुणांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह आरोपींच्या फोटोला जोडे मारून अंदोलन करत फोटोंचे बॅनर जाळले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) क्रूरतेन मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूर मध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या तसेच सरकारने धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत मंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी टाळाटाळ करीत उशिरा राजीनामा घेतला असा अरोप करत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील खंडणी आणि 302 चा गुन्हा दाखल करा.
या (Santosh Deshmukh murder case) मागणीसाठी लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक चार मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान काळ्या फिती बांधून संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आरोपींचे फोटो जाळत निषेध व्यक्त केला आहे. तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.