परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शेतकर्यांनी तहसिल कार्यालयात दिले निवेदन!
परभणी (Debt Relief Campaign) : राज्यातील शेतकरी कर्ज मुक्त व्हावा, यासाठी किसान ब्रिगेडने (Kisan Brigade) सुरु केलेल्या, कर्जमुक्ती अभियानाला (Debt Relief Campaign) गंगाखेड तालुक्यातील शेतकर्यांनी (Farmers) प्रतिसाद देत बुधवार 14 मे रोजी तहसिल कार्यालयात निवेदन सादर केले आहे.
सततच्या नापिकीमुळे (Infertility) कर्जाच्या खाईत लोटलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना कर्ज मुक्ती (Debt Relief) मिळावी. यासाठी शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे (Editor Prakash Bhau Pohre) यांनी किसान ब्रिगेडच्या वतीने कर्जदार शेतकऱ्यांकरीता कर्जमुक्ती अर्ज अभियान राबविले आहे. या अभियानाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत बुधवार 14 मे रोजी गंगाखेड येथिल नायब तहसिलदार (Naib Tehsildar) अशोक केंद्रे, नायब तहसीलदार सुनिल कांबळे यांच्याकडे किसान ब्रिगेडच्या लेटर हॅडवर कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले आहे. यावेळी सुनिल चाफळे, दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अन्वर शेख लिंबेकर, गोविंद मानवतकर, उत्तम पवार, शिवाजी कांबळे, अंकुश कांबळे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.