Pusad suicide case :- तालुक्यातील हुडी (खु.) येथील तरुण शेतकर्याने सततची नापिकी कर्जबाजारीपणा व परिवाराच्या उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत चिंताग्रस्त होऊन ४ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतच्या जुन्या सार्वजनिक विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली.
विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
सदर वार्ता सर्वत्र पसरल्यावर महसूल विभागाचे व ग्राम महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तरुण शेतकरी (Farmer) संजय पांडुरंग पवार (४०) रा. हुडी असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. सदर व्यक्ती हा दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होता अशी माहिती मिळाली. त्यांचा दोन-तीन दिवसापासून शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मृतक शेतकरी संजय पवार यांच्या वडिलांच्या नावाने मौजा चिकणी येथे शेत सर्वे नंबर १७/१ जमीन आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. यासंदर्भात ग्राम महसूल अधिकार्यांनी तहसीलदार पुसद यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.




