शुभांगी सुनिल मेंढे यांचा पुढाकार
भंडारा (Shubhangi Sunil Mendhe) : दुसर्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी झटणार्या स्वच्छता दुतांसाठी आजचा दिवस आगळावेगळा ठरला. भंडारा नगर परिषदेतील सफाई कर्मचार्यांसोबत शुभांगी मेंढे यांनी साजरा केलेला दीपोत्सव कर्मचार्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविणारा होता. सलग नऊ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आता स्वच्छता दूतांसाठी परिपाठ झाला आहे.
त्यांच्या एका कृतीने समाज निरोगी राहतो. पण त्यांच्या आनंदाचे काय? आपली एक कृती असंख्य सफाई कामगार बांधव भगिनींसाठी आनंद देणारी ठरू शकते. या विचारातून स्वच्छता दुतांसोबत दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वी शुभांगी सुनील मेंढे यांनी घेतला आणि तो अविरत सुरु आहे.
आजही या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत भंडारा येथे करण्यात आले होते. यावेळी माजी खा.सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष चंद्रकला भोपे, कृष्णकुमार बत्रा, सुर्यकांत इलमे, संतोष त्रिवेदी, नितीन कडव, शैलेश मेश्राम, महेंद्र निम्बार्ते, अनुप ढोके, कृष्णा उपरीकर, शिव आजबले, राजू भोजवानी, ओजल शरणागत, आशिक चुटे, डॉ.सुचिता वाघमारे, मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, नगरसेविका वनिता कुथे, साधना त्रिवेदी, श्रद्धा डोंगरे, आशा उईके, मधुरा मदनकर, गीता सिडाम, ज्योती मोगरे, प्रीती ब्राह्मणकर, रोशनी पडोळे, अन्नपूर्णा वंजारी, सुजाता मुळे, अर्चना श्रीवास्तव, जया हिंगे, सना खान, नितीन तुमाने, विपुल पराते व आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते महिला स्वच्छता कामगारांना साडी आणि मिठाईची भेट देण्यात आली. पुरुष कामगारांनाही भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी कर्मचार्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या आनंदाचाही कुणीतरी विचार करतो, याचे समाधान त्या सर्वांच्या चेहर्यावर दिसत होते. यावेळी कर्मचार्यांच्या मुलांसाठी भेटवस्तू देण्यात आल्या.
तो क्षण अपार आनंदाचा : शुभांगी मेंढे
जे इतरांसाठी झटतात, त्यांच्या चेहर्यावर आनंद पाहून मिळणारे समाधान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत घालविला प्रत्येक क्षण हा अपार आनंद देऊन जाणार आहे. नऊ वर्ष झाली, आमच्या दिवाळीची सुरुवात या स्वच्छता दुतांसोबत होते. ही परंपरा अखंड चालू राहील, असा विश्वास शुभांगी मेंढे यांनी व्यक्त केला.