मानोरा (PM Narendra Modi) : पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पणासाठी दि. ५ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले होते. पूर्व नियोजनाप्रमाणे त्यांना बंजारा समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर मागण्यांचे निवेदन देऊन चर्चेकरीता समाजाच्या शिष्टमंडळाला वेळ दिलेला होता, त्याअनुषंगाने शिष्टमंडळाने नंगारा भवन येथे पंतप्रधानांची भेट घेतली . यावेळी पंतप्रधान मोदींनी समाजाचे प्रश्न गंभीरपणे समजून घेतले. अगदी समोरासमोर आपल्या व्यथा शिष्ट मंडळाने त्यांच्या समोर मांडली.
यावेळी त्यांचे सोबत कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री ना. संजय राठोड उपस्थित होते. (PM Narendra Modi) पंतप्रधान समोरासमोर भेटत असल्याने फोटो घेण्यास मनाई होती. मोबाईल फोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रतिनिधी मंडळात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष माजी मंत्री अमरसिंग तिलावत, माजी खासदार डॉ. उमेश जाधव, के. जी. बंजारा, डॉ. रमेश आर्य, शंकर पवार, डॉ. टि. सी. राठोड, इंजि अमर राठोड व ज्योतिराम चव्हाण यांचा समावेश होता.