२९ उमेदवार रिंगणात…
नवी दिल्ली (New Delhi) : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात २९ उमेदवारांची नावे आहेत. भाजपच्या या यादीत भाजपने आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल (Aam Aadmi Party Arvind Kejriwal) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी (Delhi Chief Minister Atishi) यांच्या विरोधात आपल्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत.
अरविंद केजरीवाल विरुद्ध प्रवेश वर्मा
भाजपच्या या यादीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांना तिकीट देण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपकडून रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांना संधी मिळाली आहे. भाजपने दिल्ली काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष अरविंद सिंग लवली (Arvind Singh Lovely) यांना गांधीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. याशिवाय मालवीय नगरमधून भाजपचे अध्यक्ष असलेले सतीश उपाध्याय यांना तिकीट मिळाले आहे.
भाजपच्या यादीनुसार, कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांना दिल्लीच्या बिजवासन मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे, ज्यांनी अलीकडेच आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. रवींद्र नेगी (Ravindra Negi) यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे, त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती.
या उमेदवारांनाही तिकीट मिळाले…
याशिवाय, दिल्लीतील रिठाळा मतदारसंघातून भाजपने कुलवंत राणा यांना तिकीट दिले आहे. आदर्श नगरमधून राजकुमार भाटिया, बदलीमधून दीपक चौधरी, मंगोलपुरीतून राजकुमार चौहान, रोहिणीतून विजेंद्र गुप्ता, शालीमार बागमधून रेखा गुप्ता, मॉडेल टाऊनमधून अशोक गोयल, करोल बागमधून दुष्यंत कुमार गौतम, पटेल नगरमधून राजकुमार आनंद यांना तिकीट मिळाले आहे. .
२९ उमेदवारांची नावे
आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) सर्व उमेदवारांची (Candidates) नावे आधीच जाहीर केली आहेत. याशिवाय काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाच्या अनेक याद्याही जाहीर केल्या आहेत. भाजपने आज शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात एकूण 29 जणांच्या नावांचा समावेश आहे.