विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका!
दिल्ली विधानसभा निवडणुक (Delhi Assembly Elections) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला असून भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, अशी हमी दिली. यासोबतच, विकसित भारताच्या (Developed India) उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे याचीही आम्ही खात्री करू. असे ते म्हणाले.
दिल्लीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट!
जनशक्ति सर्वोपरि!
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचे अभिनंदन केले आहे. दिल्लीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर (X) लिहिले, ‘जनता शक्ती सर्वोपरि आहे’! विकास जिंकला, सुशासन जिंकला. ही आमची हमी असल्याचे त्यांनी सांगितले.
विकसित भारत घडवण्यात दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल.!
पुढे त्यांनी लिहिले की, भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझा सलाम आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या उदंड आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मला माझ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी या प्रचंड जनादेशासाठी (Mandate) रात्रंदिवस काम केले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी दृढपणे समर्पित राहू. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, हीच आमची हमी आहे, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.
पीएम मोदींचा आप वर हल्लाबोल..!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पीएम मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आणि दिल्लीतील आप सरकारला (Govt.) आपत्तीचे सरकार म्हटले होते. या आपत्ती सरकारपासून दिल्लीला मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील जनतेला आवाहन केले होते, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून (Assembly Election Results) हे स्पष्ट झाले आहे की, दिल्ली निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे, तर आम आदमी पार्टीच्या सरकारचा पराभव झाला आहे.