मानोरा(Washim):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येत असलेली ई – पॉस मशीन ही सर्व्हर तांत्रिक समस्यामुळे(Technical problems) मागील आठवडाभरापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तालुकाच नव्हे संपूर्ण जिल्हयातील धान्य वितरण(grain distribution) व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. यात शासनाने शिषपत्रिकेतील प्रत्येक व्यक्तीला ई – केवायसी(E-KYC) करण्याचे बंधनकारक केल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला रास्त भाव दुकानावर चकरा मारण्याची पाळी आलेली आहे.
मागील महिन्यापासून सर्व्हरची समस्या सतत येत असल्याने धान्य वितरण व्यवस्था ठप्प
संपूर्ण राज्यासह जिल्हाभर माहे जुलैचे धान्य वितरण ई – पॉस मशीनव्दारे सुरू आहे. पण सकाळपासूनच सर्व्हर डाऊन ची तांत्रिक समस्या उदभवत आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारक ग्राहकांचा रोष रास्त भाव दुकानदारावर होत आहे. गेल्या ३ महिन्यापूर्वी शासनाने पुरविलेल्या नवीन ई – पॉस मशीन पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करून २ जी मशीन बदलून ४ जी मशीनचे रास्त भाव दुकानदारांना वाटप करण्यात आले. मात्र मागील महिन्यापासून सर्व्हरची समस्या सतत येत असल्याने धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. ई – पॉस मशीनमध्ये वेळोवेळी येत असलेल्या अडचणीमुळे शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यातच शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डतील प्रत्येक व्यक्तीला ई – केवायसी करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे.
सर्व्हर डाऊन तांत्रिक समस्यामुळे रास्त भाव दुकानदार यांच्यासह रेशन कार्ड धारक वैतागले
परंतू सतत येत असलेल्या सर्व्हर डाऊन तांत्रिक समस्यामुळे रास्त भाव दुकानदार यांच्यासह रेशन कार्ड धारक वैतागले आहे. संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करून सदरील समस्या सोडवून रास्त भाव दुकानदार व रेशन कार्ड (Ration Card)धारकांनाची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. सर्व्हर प्रॉब्लेम तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण व ई – केवायसी व्यवस्था पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामूळे धान्य वितरण व ई – केवायसीची मुदतवाढ देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार यांच्यासह रेशन कार्ड धारकामधून होत आहे.