मानोरा(Washim):- कोतवाल संवर्गास चतूर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबीत मागण्या सोडवून न्याय द्यावा, असे निवेदन पोहरादेवीत प्रधानमंत्री(Prime Minister) दौऱ्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री (Guardian Minister) ना संजय राठोड आले असता शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी कोतवाल संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोतवाल संघटनेच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आजाद मैदान मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कोतवाल संवर्गाला चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. आम्हाला न्याय देण्यात यावा, असे निवेदन पालकमंत्री यांना कोतवाल यांनी दिले आहे.