गंगाखेड तालुका प्रशासनाला निवेदन
परभणी (crop insurance) : गंगाखेड तालुक्यातील शेतकर्यांना मदत द्यावी, प्रलंबीत पीक विमा (crop insurance) अदा करावा. तसेच खरीप २०२३ चे सोयाबीन, कापुसाचे अनुदान देण्यासाठी ई-पिक पाहणीची केलेली अट रद्द करण्याची मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी निवेदनाद्वारे डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वात तालुका प्रशासनाला दिला आहे.
ई-पिक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी
गंगाखेड तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (crop insurance) झाले आहे. सुरूवातीला पावसाचा खंड आणि जास्तीच्या पावसाने उत्पन्नात मोठया प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तर खरीप पिकाचे अनुदान देतांना (E-pick inspection) ई- पिक पाहणीची केलेली अट रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर डॉ. सुभाष कदम, शेषराव गिते, कृष्णाजी सोळंके, नारायण बोमशेटे, जानकीराम पवार, केशवराव भोसले, माणिकराव नवले, सुर्यभान नवले, चंद्रभान भोसले, गणेश इंगळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.