हिंगोली (Hingoli Medical College) : जिल्ह्यात नव्याने सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (Hingoli Medical College) संत मानदास बाबा यांचे नाव देण्याची मागणी उत्तर भारतीय युवक महासंघाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत ९ ऑक्टोंबरला उत्तर भारतीय युवक महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यातील नामवंत श्री मानदास बाबा महाराज यांचे नाव जिल्ह्यात नव्याने सुरू होणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावे, त्यामुळे मानदास बाबा यांचे नाव महाराष्ट्रात सर्वदुर प्रचलित होणार तसेच भारतातील जो दोन नंबरचा दसरा महोत्सव सर्वजण साजरा करतो तो सुद्धा मानदास बाबा यांनीच सुरू केलेला आहे. मानदास बाबांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संत श्री मानदास बाबा महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Hingoli Medical College) असे नामकरण जाहीर करावे अशी मागणी सर्व हिंगोलीकरांच्यावतीने करण्यात आली आहे.