परभणी(Parbhani):- सर्वोच्च न्यायालयाच्या(Supreme Court) अंतिम निकालानुसार परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करावा, अशी मागणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील(Agricultural University) प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांनी सोमवार २२ जुलै रोजी निवेदनाद्वारे कुलगुरुंकडे केली आहे.
कारवाई न झाल्यास विद्यापीठ गेटसमोर आमरण उपोषण
कर्मचार्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. या निर्णयावर विद्यापीठ स्तरावर आवश्यक कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे. सहानुभूतीपूर्वक विचार करुन न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकरण निकाले काढावे, ५ ऑगस्ट पर्यंत कारवाई(action) न झाल्यास विद्यापीठ गेटसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या वेळी जिल्ह्यातील 130 प्रकल्पग्रस्तांची उपस्थित होते