वर्धा जिल्हाधिकारी यांचा कडे भोई समाजाची निवेदनातून मागणी
वर्धा (Sexual assault cases) : भोई समाजातील चार वर्षीय चिमुकलीवर बीड जिल्ह्यातील परळी तालुका बोरखडे गावातील चिमुकली शाळेत गेली असता तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यामधील दोशींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन वर्धा जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलामार्फतआज देण्यात आले. शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी यासंबंधीचे वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी भोई समाजाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रमोद हजारे उपाध्यक्ष अरुण बावने संघटन प्रमुख मनोज बावणे विजय नागपुरे मनोज जोगे संगीता नागपुरे भरत परतपुरे सचिन मांढरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती