मानोरा (Washim) :- छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) नगर या शहरातील हिंदू, दवेष्टा, क्रूरकर्मा औरंग्या याची कबर हटविण्याच्या मागणीचे निवेदन दि. १६ मार्चला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांना पाठविणेकरिता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर
निवेदनात नमूद केले आहे की, उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी नगर या शहरात आहे. वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते संभाजीनगर येथे पुरले. व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली. या औरंग्याने शिख गुरु तेगबहाद्दुर यांची क्रूर हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेब ज्यांदयाना ते केवळ मुस्लीम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिमून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही. अशी भयंकर यातनामय अशी हत्या केली. श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले. मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिराचा यानेच विध्वंश केला. सोरटी सोमनाथाचे मंदीर पुन्हा यानेच फोडले. त्र्यंबकेश्वर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदूंच्या प्रेताच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूची भयानक क्रूर कतल केली.
हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. अश्या क्रूरकर्मा व आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे भारत देशात गुलामीचे, अनंत यातनाचे प्रतीक आहे. ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत पाठविले आले. निवेदनावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी सौरभ राठोड, राम हेडा, अरविंद इंगोले, करण ठाकूर यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.