परभणी (Parbhani) :- पैसे परत मागण्याचा तगादा लावत असल्याने दोघांच्या त्रासाला कंटाळुन व ताणतणावात एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. हि घटना परभणी शहरातील शाहु नगरात १८ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. युवकाला आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहू नगरातील घटना दोन आरोपींवर गुन्हा दाखल
विजय अंकुश वाव्हळे (वय ३५ रा.शाहू नगर) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाची बहिण गवळणबाई मस्के यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी समाधान सुतारे, मिरा वाबळे या दोघांनी विजय यास पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून युवकाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. नातेवाईकांनी युवकाला रुग्णालयात (hospital) नेले. मात्र डॉक्टरांनी तपासुन मृतक घोषीत केले. मृतकाच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून त्यावर आरोपींची नावे आहेत. युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि कदम करत आहेत. घटना स्थळी पो.ना चितांबर कामठेवाड, पो ना.बिवकड यांनी भेट दिली.