आरोग्य विभागाचे पथक दाखल
परभणी/पाथरी (Dengue patient) : तालूक्यातील नाथरा गावात तापिच्या साथीने थैमान घातले असुन ५० पेक्षा जास्त रुग्ण ताप आणि चिकन गुण्याच्या आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार घेत आसतांनाच गावात रविवार १५ सप्टेंबर रोजी (Dengue patient) डेंग्यू आजाराचा एक रुग्ण आढळला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच (Health Department) आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नाथरा या गावातील ताप, सर्दी, चिकन गुणिया मुळे अनेकजण आजारी आहेत. त्यातील रामेश्वर वाकणकर यांना गेल्या काही दिवसात ताप येत होता.
सदरील व्यक्तीने पाथरगव्हाण येथील खाजगी रुग्णालयात (Private hospitals) उपचारासाठी गेले होते. त्यांची रक्त तपासणी केली असता त्यांना (Dengue patient) डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर रुग्णाला परभणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान डेंग्यू रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे . रविवारी दुपारी दोन वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निखिल पुजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, विस्तार अधिकारी डॉ. बाळासाहेब सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेश्वर गिराम, आरोग्य कर्मचारी शिवाजी कानशुकले यांनी गावात जाऊन कंटेनर सर्वे करून घरोघरी भेट दिली. अबॅटिंग व डेंग्यूचे रक्त नमुने घेतले आहेत. डेंग्यूचा रुग्ण निघाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून गावात (Dengue patient) तापीच्या रुग्णांची वाढ झाली आहे. यासंदर्भात प्रा.आ. केंद्राला माहिती दिली होती. परंतु गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. आता डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे. (Health Department) आरोग्य विभागाकडून तात्काळ उपाय योजना कराव्यात.
– अनंत वाकणकर, ग्रामस्थ