परभणी(Parbhani) :- पावसाळ्यामध्ये डेंग्यू (Dengue) तापाचा धोका देखील वाढतो. डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी(winter officer) डॉ. रावजी सोनवणे यांनी केले आहे.
डेंग्यू ताप टाळण्यासाठी ही घ्या काळजी
पावसाचे पाणी खड्डे, नाल्या, निरुपयोगी वस्तुमध्ये साचते. या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. या डासांपासून डेंग्यू होण्याचा धोका वाढतो. शासनाने जुलै महिना डेंग्यु प्रतिरोध महिना म्हणून घोषीत केला आहे. डेंग्यू तापाचा (Dengue fever) आजार ज्या डासापासून(mosquito) होतो त्यांना टायगर मॉस्क्युटो (Tiger Mosquito) असे देखील म्हणतात. डेंग्युच्या रुग्णांमध्ये अचानक थंडी वाजून ताप येणे, तापासोबत रक्तस्त्राव, अंग दुखी, शरीराव पुरळ, मळमळ उलटी, लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे आणि अशक्तपणा, अशी लक्षण दिसून येतात. डेंग्यु ताप हा विषाणुजन्य आजार असल्याने त्यावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत.
लक्षणे दिसताच तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला (Doctor’s advice)घ्यावा. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आपल्या घराभोवती पाणी साचु देवू नये, कोरडा दिवस पाळावा, रात्री झोपताना अंगभर कपडे घालावे, मच्छरदानीचा वापर करावा, डासाची उतपत्ती होणार्या ठिकाणी रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकून डास नष्ट करावेत, योग्य ती खबरदारी घेतल्यास डेंग्युचा आजार टाळता येऊ शकतो.
२५४ रक्तजल नमुने तपासले; २ डेंग्यू दुषित रुग्ण
१ जानेवारी ते ३० जून या कालावधी मध्ये २५४ रक्तजल नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये २ डेंग्यू दुषित रुग्ण आढळले आहेत. सन २०२१ मध्ये १ हजार २३६ नमुने तपासण्यात आले होते. त्यामध्ये ३, सन २०२३ मध्ये तपासलेल्या १ हजार १९९ नमुन्यांमध्ये सहा डेंग्यू दुषित रुग्ण मिळाले. सन २०२२ मध्ये ८५७ नमुने तपासले त्यामध्ये एकही रुग्ण आढळला नाही.