गोंदिया/अर्जुनी मोर (Gondia):- एकदाच्या निवडणूका पार पडल्या की, निवडून आलेला जनप्रतिनिधी क्षेत्रात काय काम करतो याची कल्पना सर्वसाधारण माणसाला कधीच नसते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे.पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूका (Elections)आल्या की त्या लोकनेत्याची अस्मिता जागृत होते आणि मग ते जनतेसाठी आज पर्यंत मी काय केले हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात.
जी. प.सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केले होते बैठकीचे आयोजन
मात्र केशोरी जी. प.क्षेत्राचे सदस्य यांनी क्षेत्रातील जनतेने लोकप्रतिनिधित्व बहाल केल्याची जान ठेवून लोकांसाठी मला काय करता येईल यासाठी सर्वच शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या विकासासाठी काय नियोजन केले आणि पुढे काय करता येईल यासाठी केशोरी येथील राधाकृष्णन हायस्कूलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सामान्य नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असला तरी या बैठकीनंतर क्षेत्रातील समस्यांचे निराकरण निश्चित होईल काय ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
आढावा बैठकीची स्तुती मात्र नियोजनाचा अभाव
अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रथमच आढावा बैठकीचे आयोजन जी. प.सदस्य श्रीकांत घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. असा तालुक्यात पहिलाच प्रयोग असल्याने सामान्य नागरिक आढावा बैठकीलां मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र सदर बैठकी दरम्यान आढावा सादर करणार्या विभागनिहाय कर्मचाऱ्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्याची चर्चा सामान्य नागरिकात होती. त्यामुळे कोण काय बोलतो हे मागे बसलेल्यांना अजिबात कळत नव्हते.