नवी दिल्ली (IFS Jitendra Rawat) : दिल्लीतील चाणक्यपुरी भागात एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकाऱ्याने आत्महत्या केली. दिल्ली पोलिसांनी या घटनेत कोणताही गैरप्रकार झाल्याबाबत नकार दिला आहे. (IFS Jitendra Rawat) जितेंद्र रावत असे ओळख पटलेले हे अधिकारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परदेश रोजगार आणि संरक्षण महासंचालनालयात संचालक म्हणून कार्यरत होते.
माहितीनुसार, 35 ते 40 वर्षांच्या रावत (IFS Jitendra Rawat) यांच्यावर नैराश्याचा उपचार सुरू होता. तो त्याच्या आईसोबत एमईए सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. घटनेच्या दिवशी ते चौथ्या मजल्यावर चढले आणि उडी मारली. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सकाळी 6:20 वाजता, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडून पोलिसांना घटनेबद्दल (PCR call) पीसीआर कॉल आला. (IFS Jitendra Rawat) रावत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. देहरादूनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि मुलांना कळवण्यात आले असून, ते दिल्लीला येत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने सकाळी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे निधन झाल्याची पुष्टी केली. परंतु त्यांचे नाव सांगितले नाही. मंत्रालयाने शोक व्यक्त केला आणि आश्वासन दिले की, ते (IFS Jitendra Rawat) रावत यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहेत, तसेच (Delhi Police) दिल्ली पोलिसांशी समन्वय साधत आहेत. 7 मार्च रोजी सकाळी (Delhi Police) नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याचे निधन झाले,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, या कठीण काळात ते कुटुंबासोबत उभे आहेत आणि अधिक माहिती जाहीर न करून त्यांच्या गोपनीयतेचा आदर करत आहेत.