हिंगोली (Deputy CM Ajit Pawar) : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांचा ८ जून रोजी नियोजित असलेला दौरा तुर्त लांबणीवर पडला आहे. ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विशेष कार्यक्रम ८ जून रोजी सेनगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्यासह शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी प्रवेश घेणार होते.
या (Deputy CM Ajit Pawar) कार्यक्रमाची जोरात तयारी सुरू असतांना पक्षस्तरावरून तुर्त हा कार्यक्रम स्थगित झाल्याचा निरोप स्थानिक पदाधिकार्यांना देण्यात आला आहे. हा कार्यक्रम तुर्त स्थगित झाला असुन, लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.