हिंगोली(hingoli) :- तालुक्यातील जोडतळा ग्रामपंचायत कारभारात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने २० जूनला उपसरपंच नारायण उर्फ विठ्ठल जाधव यांनी ग्रा. प समोर स्वतःला जमिनीत आर्ध गाडून अनोखे आंदोलन केले.
स्वतःला अर्धे गाडून अनोखे आंदोलन
या प्रकरणी जोडतळा ग्रा.प च्या कारभरात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता उपसरपंच नारायण उर्फ विठ्ठल जाधव (पाटील) यांनी प्रशासनास अनेक वेळा निवेदन दिले होते. त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगात झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात २४ मे रोजी निवेदन तर रोजगार हमी योजनेतून झालेल्या व होत असलेल्या निकृष्ठ दर्जाच्या पांदण रस्त्याची चौकशी होण्याकरीता १८ व ३१ मे निवेदन दिले होते. या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी ३० रोजी प्रशासनाला कळविले होते. तसेच एप्रिल महिन्यात घेण्यात येणारी मासिक सभा (monthly meeting) आचारसहिंतेच कारण सांगुन न घेता कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी चौकशी व्हावी यासाठी ३० मे रोजी निवेदनाद्वारे कळविले होत. परंतु कोणत्याही अर्जाची दखल घेतली नसल्याने एक प्रकारे निकृष्ठ कामाचे समर्थन केल्याचे दिसून येत असल्याने २० जून रोजी उपसरपंच नारायण उर्फ विठ्ठल जाधव (पाटील) यांनी जोडतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वतःला अर्धे गाडून अनोखे आंदोलन (movement) केले. या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी गटविकास अधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी लोखंडे यांनी धाव घेऊन लेखी आश्वासन दिल्याने उपसरपंच नारायण उर्फ विठ्ठल जाधव यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी बासंबा ठाण्याचे तारे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.