मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम; जंतर-मंतरवरील आंदोलनांवर बंदी, दिल्ली पोलिसांचा ११ ऑक्टोबरचा नवा आदेश चर्चेत
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास, राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे हे आंदोलनासाठी जंतर-मंतर येथे पोहोचले होते. मात्र, या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. ताब्यात घेतल्यानंतर या तिघांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत CJP कडून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर पक्षाचे नेते ठाम आहेत. यापूर्वीही पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले होते. सुटका झाल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
STORY | CJP's Saurav Das, Ashutosh Ranka detained near Jantar Mantar; Dipke says 'cannot de-notify resistance' Cockroach Janta Party (CJP) leaders Saurav Das and Ashutosh Ranka were detained by Delhi Police on Tuesday while they were trying to reach Jantar Mantar, police sources said. READ: https://t.co/JFJc8thxHr VIDEO | (Source: CJP leader Ashutosh Ranka's X handle) (Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) October 13, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनांना बंदी; तीन नेत्यांना ताब्यात घेतले
दिल्ली पोलिसांनी राजधानीतील आंदोलनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांमधून जंतर-मंतरचे नाव वगळले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात कायमस्वरूपी आदेश जारी केला. या आदेशानुसार, जंतर-मंतर येथे यापुढे निदर्शने आणि आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही.
पोलिसांनी आंदोलनांसाठी पर्यायी ठिकाणेही निश्चित केली आहेत. त्यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मैदानाचा समावेश आहे. या नव्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर CJP चे नेते जंतर-मंतर येथे पोहोचल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
#WATCH | Cockroach Janta Party (CJP) Chief Spokesperson Saurav Das and its National Spokesperson Ashutosh Ranka had arrived at Jantar Mantar. Both of them have been detained by the Delhi Police. (Video: Delhi Police) https://t.co/seS0edOCHA
— ANI (@ANI) October 13, 2026
१० ऑक्टोबरला दिल्ली विमानतळावरूनही झाली होती अटक
यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी, रविवारी, या तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पुढील एक वर्ष शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी न होणे आणि चांगले वर्तन राखणे, अशा अटी त्यांच्यावर घालण्यात आल्या होत्या.
सुटकेनंतरही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
ताब्यातून सुटका झाल्यानंतर CJP च्या नेत्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते हिंगोली येथे गेले. दुसरीकडे, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आंदोलन सुरू ठेवले. आज अजिंक्य शिंदे यांच्यासह हे तिघे पुन्हा जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी पोहोचले असता दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
VIDEO | Hingoli, Maharashtra: CJP leader Abhijeet Dipke on Saurav Das, Ashutosh Ranka being detained near Jantar Mantar, says, "Has hoisting the national flag become a violation of the law? Our team, led by Ashutosh Ranka, Saurav Das and Ajinkya Shinde, went to Jantar Mantar this morning and waved the Tricolour there. Since when has waving the Tricolour become a violation of the law? Anyone who thinks that hoisting the Tricolour at Jantar Mantar is a violation of the law is anti-national. Saurav Das, Ashutosh Ranka, Ajinkya Shinde and others accompanying them have been arrested for waving the Tricolour. Strictest possible action should be taken against this, because how can you arrest someone for waving the national flag? What kind of country is this? What kind of rule is this? Since when has waving the Tricolour in our own country, India, become a violation of the law? This is the biggest example of a dictatorial mindset." #CJP #AbhijeetDipke #JantarMantar (Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) October 13, 2026
आंदोलनासाठी आता रामलीला मैदान आणि बुराडी मैदानाचे पर्याय
दिल्ली पोलिसांच्या नव्या आदेशामुळे राजधानीतील आंदोलनांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. जंतर-मंतरऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मैदान येथे आंदोलने आयोजित करता येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Ashutosh Ranka and Saurav Das couldn’t even bring 20 people to Jantar Mantar this morning, yet they talk about bringing the entire country out onto the streets. Their protest didn’t even last 10 seconds before they were detained. Looks like CJP’s days are over. Will these two sign another bail bond after today’s detention?
— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) October 13, 2026
दरम्यान, CJP नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पक्षाची पुढील भूमिका काय असेल आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन कोणत्या ठिकाणी सुरू राहणार, याकडे लक्ष लागले आहे.